
Solapur News : सक्तीची वीजबिल वसुली व विजतोडणी थांबवा; समाधान आवताडे
मंगळवेढा : पंढरपूर विभागात महावितरण कडून शेतीपंपाची सक्तीने सुरू असलेली विज बिल वसुली व तोडणी त्वरित थांबवावी अशा सूचना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समाधान आवताडे यांनी दिली.
महावितरणकडून सध्या राज्यात थकीत वीज बिलासाठी वसुली मोहीम राबवली जात आहे सध्या द्राक्ष, डाळिंब व इतर पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे.
तर काही गावात थेट ट्रान्स्फार्मर बंद करून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून त्यामुळे शेतकरी वर्ग आणखीनच अडचणीत आला. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात उजनी कॅनॉल,भीमा, माण नदीला पाणी सोडल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही.
त्यामुळे हाता - तोंडाशी आलेल्या पिकावर परिणाम होऊ लागला ही पिके हातची जात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू लागला. त्यामुळे वीज तोडणी मोहीम थांबवावी.होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आवताडे यांच्याकडे मांडल्या.
या मागणीची दखल घेत आ.समाधान आवताडे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांवरील अन्यायकारक व शक्तीने होणारी वीज बिल वसुली थांबवून विज तोडणी करू नये, शेतकऱ्यांना विज बिल भरण्यासाठी मुदत द्यावी तसेच शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने विज बिल वसुली करावी.
शेतकऱ्यांनी देखील पूर्णतः मोफत वीज वापरण्याऐवजी काही प्रमाणात विज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे.वसुलीमुळे शेतकरी वर्गाला विजेच्या संदर्भात चांगल्या पायाभूत सोयी सुविधा मिळणार आहेत.
शेतकऱ्यांनी देखील महावितरण टिकली पाहिजे या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना विज बिल भरून सहकार्य करावे व विजेचा अतिरिक्त वापर न करता गरजेपुरता वापर करून वीज बचत करावी, तसेच सक्तीने वीज बिल वसुलीसाठी मुद्दामहून कोण त्रास देत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन आ.आवताडे यांनी केले