
सोलापूर : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेले एसटी बसमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटींचे उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न असल्याचे माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.