MSRTC buses witnessed strong passenger demand during the Diwali holiday season, generating ₹548.22 crore in revenue in the first 16 days of November.
esakal
सोलापूर : दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत एसटीने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.