
सोलापूर: हत्तरसंग कुडल (ता. दक्षिण सोलापूर) येथे हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात आढळलेले दुर्मिळ शिवलिंग हे अत्यंत रहस्यमय आहे. येथे एकाच शिवलिंगावर ३५९ शिवमुखे व मुख्य शिवलिंग मिळून ३६० मुखाचे एक शिवलिंग आहे. हे शिवलिंग कालचक्राचे प्रतीक असल्याची माहिती पुरातत्त्व अभ्यासक विशाल फुटाणे यांनी दिली.