Mangalwedha News : जिवाची मुंबई हौस भोवली! तिघी मैत्रीणी मुस्कान-पोलीस पथकाच्या तावडीत सापडल्या

12 वर्षाच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी घरात कुणाला काही न सांगता मुंबईला निघाल्या.
Minor Girl Caught
Minor Girl Caughtsakal
Updated on

मंगळवेढा - शहरातील शैक्षणिक संस्थेत एकाच वर्गात शिकणार्‍या 12 वर्षाच्या अल्पवयीन तीन मैत्रिणी जिवाची हौस करण्यासाठी घरात कुणाला काही न सांगता मुंबईला निघाल्या. पण पोलीसांच्या मुस्कान पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अखेर पंढरपूर बसस्थानकावरुन ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस स्टेशनला हजर केले.

या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढा शहरातील 12 वर्षे वयोगटातील तीन मैत्रिणी शहरातील शैक्षणिक संस्थेत इयत्ता सातवी वर्गात शिकत होत्या. गुरुवार दि. 6 रोजी शाळेत असतानाच या तिघींनी मुंबईला जावून जिवाची हौस करण्याचे नियोजन करून शाळा सुटल्यावर घरी गेल्या.

घरातील नातेवाईकांना न सांगता तिघीनी मंगळवेढा बसस्थानक गाठून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. मुली अचानक घरातून गायब झाल्याने तिन्ही पालकांना धक्का बसला.

या घटनेची खबर पोलीसात जाताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना घटना सांगून शहर बीटच्या पोलीसांना स्टँड परिसर व प्रशालेचा परिसरातले सी.सी.टी.व्ही.तपासताच या तपासाला दिशा मिळाल्याने पो. नि. बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नागेश बनकर, विजय पिसे, पोलीस हवालदार वंदना अहिरे, पोलीस हवालदार सुनिता चवरे, श्रीमंत पवार, पोलीस नाईक कृष्णा जाधव आदींचे मुस्कान पोलीस पथकाने रात्री 9.30 वा. पंढरपूर बसस्थानक गाठले.

त्या तिघी मुली मुंबईला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसस्थानकावर बसल्याचे निदर्शनास येताच मुस्कान पथकाने सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी पोलीसांनी त्या तिघीकडे अधिक चौकशी केली असता आम्ही मुंबईला फिरावयास निघालो आहोत असे सांगितले.

आपल्याकडे फिरण्यासाठी किती पैसे आहेत? असे विचारले असता केवळ 60 रुपये असल्याचे त्या तिघी मैत्रिणी सांगताच मुस्कान पथकही कोड्यात पडले. एवढ्या पैशात तुम्ही मुंबईला जाणार का? व जिवाची हौस करणार का? असा प्रश्न करताच त्यांची बोलती बंद झाली. त्या तिघीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला हजर केले. दरम्यान आई, वडिलांना बोलावून त्या तिघी मुलींचे पोलीस अधिकार्‍यांनी समुपदेशन करुन त्यांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com