Solapur Crime: विनापरवाना बंदूक बाळगली; मुंगशीचा तरुण अटकेत
Unlicensed Gun Seized in Mungshi: झडती घेतल्यावर त्याच्या कंबरेला मागील बाजूला पॅन्टीत खोचलेली बंदूक आढळली. खिशात मॅग्झीन (गोळ्या) होते, त्यात दोन काडतुसे (गोळ्या) होती. पोलिसांनी या कारवाईत बंदूक, काडतुसे, दुचाकीसह एकूण एक लाख १० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सोलापूर : विनापरवाना आणलेली बंदूक विक्रीसाठी तरुण फिरत असल्याची खबर सोलापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितास जेरबंद केले. हणमंत बापू महाडिक (वय ३०, रा. मुंगशी, ता. माढा) असे त्याचे नाव आहे.