शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले...

शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले महापौर आमचाच
शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले महापौर आमचाच
शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले महापौर आमचाचCanva
Summary

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत सर्वांनीच "एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे.

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi Government) माध्यमातून शिवसेना (Shivsena), कॉंग्रेस (Congress) व राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) सत्ता आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत सर्वांनीच "एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणतात, महापालिकेवर सत्ता आमचीच, महापौरही आमचाच असेल; तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष म्हणाले, आमच्याकडे दुपटीने इच्छुक असून आम्हीही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले, शिवसेनेची सत्ता आली नाही तरीही सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर आम्हीच असणार.

शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले महापौर आमचाच
आरक्षणाशिवाय महापालिका, झेडपीच्या निवडणुका नकोच !

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने शहरातील 26 प्रभागांमध्ये "शिवसंपर्क' अभियान राबविले. दुसरीकडे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभागनिहाय संवाद यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. कॉंग्रेसनेही प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन केले आहे. या बैठकांसाठी, अभियान तथा संवाद यात्रेसाठी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे कोणीही सोबत असणार नाहीत, याची प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले. शहर मध्य व शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची लोकप्रियता वाढली असून पक्षसंघटनही मजबूत झाल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनीही शहरात प्रचाराला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काही दिवसांत सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेही सोलापूर दौरा करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होणार का, नेमका महापौर कोणाचा असणार, याचा अंदाज बांधला जात आहे.

कोठेंच्या पक्षांतराचा ताकदीवर परिणाम नाहीच

शिवसेनेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेतेपद मिळविले आणि शेवटच्या वर्षात नेहमीप्रमाणे शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय महेश कोठे यांनी घेतला. मात्र, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, राज ठाकरे अशा अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली; तरीही शिवसेनेची ताकद कमी झाली नाही. त्यामुळे कोठे हे राष्ट्रवादीत गेले म्हणजे शिवसेनेची ताकद संपली, असे समजू नये. स्व. विष्णुपंत कोठे हे असतानाही त्यांचे सात-आठ नगरसेवक निवडून यायचे आणि आताही महेश कोठेंची ताकद तेवढीच आहे. आगामी महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताना शिवसेनेला घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्‍त केला आहे.

शिवसेना म्हणते किंगमेकर आम्हीच! कॉंग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणाले महापौर आमचाच
'डीसीसी'च्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत ब्रेक ! सहकार विभागाचा आदेश

कॉंग्रेसची 102 उमेदवारांची यादी तयार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, परंतु शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत यायचे नसल्याने कॉंग्रेस ताकदीनिशी स्वबळावर लढेल, असे स्पष्टीकरण शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिले. आगामी महापालिका निवडणुकीत निश्‍चितपणे महापौर हा कॉंग्रेसचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. भाजप सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात नागरिकांना निवडणुकीपूर्वी दिलेले कोणतेच आश्‍वासन पूर्ण केले नाही. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणूक लढविली जाईल. आम्ही "एकला चलो रे'ची तयारी केली असून सर्व प्रभागांमधील 102 इच्छुकांची यादी आम्ही तयार केली आहे, असेही श्री. वाले यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

महापालिकेवर राष्ट्रवादीचाच झेंडा

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांत प्रभागनिहाय संवाद यात्रा काढली जाणार आहे. त्यातून शहर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, फादर बॉडी, युवक राष्ट्रवादी, अल्पसंख्याक सेल, महिला आघाडी, युवती राष्ट्रवादी, सामाजिक सेल असे एक हजार 80 पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रभागनिहाय बैठका घेतल्या जातील. तौफिक शेख, महेश कोठे, आनंद चंदनशिवे हे पक्षात आल्याने राष्ट्रवादीची ताकद निश्‍चितपणे वाढणार आहे. त्यातून आम्ही महापालिकेवर सत्ता मिळवू, असा विश्‍वास कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्‍त केला. नगरसेवकांच्या दुप्पट, तिप्पट उमेदवार राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com