esakal | संभाजी तलावाजवळ उभारणार एक एमएलडी क्षमतेची "एसटीपी'!
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी तलावाजवळ उभारणार एक एमएलडी क्षमतेची "एसटीपी'!

संभाजी तलावाजवळ उभारणार एक एमएलडी क्षमतेची "एसटीपी'!

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

धर्मवीर संभाजी तलावात ड्रेनेजलाइनचे पाणी मिसळण्यामुळे गत अनेक वर्षांपासून निर्माण झालेले प्रदूषण, पर्यायाने नागरी अनारोग्याची समस्या आता दूर होणार आहे.

सोलापूर : विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावात (Dharmaveer Sambhaji Lake) ड्रेनेजलाइनचे पाणी मिसळण्यामुळे गत अनेक वर्षांपासून निर्माण झालेले प्रदूषण (Pollution), पर्यायाने नागरी अनारोग्याची समस्या आता दूर होणार आहे. ही समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी महापालिकेने या तलावाजवळ एक एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्याची योजना आखली आहे. या कामाच्या दोन कोटी 73 लाख 97 हजारांच्या मक्‍त्याला मंगळवारी महापालिका (Solapur Municipal Corporation) सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. "सकाळ'ने या विषयाला अनेकदा वाचा फोडली होती. (Municipal Corporation will set up an MLD capacity STP plant near Sambhaji Lake)

हेही वाचा: चिमुकल्यांची ऑगस्टमध्ये ऑफलाइन शाळा? आपत्ती व्यवस्थापनला प्रस्ताव

महापालिकेची जुलै महिन्याची सभा महापौर श्रीकांचना यन्नम (Mayor Srikanchana Yannam) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभापटलावर प्रशासनाकडून संभाजी तलावासंदर्भात विषय होता. या तलावाचे राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत संवर्धन-सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत या तलावाजवळ एक एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा मक्ता दिल्लीच्या डेल्को कंपनीला देण्यास तसेच या कामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून "निरी' या संस्थेला नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: "ठाकरे कुटुंबीयांची आपुलकी भावली..!'

तलावाच्या आसपासच्या नागरी वसाहतींतील ड्रेनेजलाइनचे पाणी या तलावात मिसळण्याच्या समस्येमुळे येथील अनेक नागरी वसाहतींमध्ये अनारोग्याची स्थिती निर्माण झाली होती. प्रभागाचे नगसेवक संतोष भोसले यांनी यासंदर्भात प्रशासनाला पत्र देऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला होता. आयुक्तांनी या ठिकाणी भेट द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र पत्र व भेट देण्याच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही, अशी त्यांची तक्रार होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने उशिरा का होईना ही समस्या मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. "एसटीपी'मुळे या भागातील वसाहतींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी तलावात सोडले जाईल. परिणामी तलावातील प्रदूषण व नागरी अनारोग्याची समस्या दूर होणार आहे.

loading image