Municipal workers protest for inclusion of Lad Committee heirs in structural reform discussions.Sakal
सोलापूर
Solapur News : आकृतिबंध सुधारणांमध्ये लाड कमिटीतील वारसांना घ्यावे; महापालिका कामगार संघटना कृती समितीची मागणी
Include Lad Committee Heirs in Restructuring Reforms: महापालिकेच्या खाते प्रमुखांकडून आपल्या विभागात आवश्यक असलेला सर्व संवर्गातील पदांची संख्या आयुक्तांनी मागवून घ्यावी व सुधारित आकृतिबंधात समाविष्ट करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठवावी.
सोलापूर : आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमात सुधारणा करताना रोजंदारी बदली, कंत्राटी व मानधनावरील कामगार आणि सन १९७५ पासूनच्या लाड कमिटीतील वारसांचा समावेश करावा, अशी मागणी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.