एखतपुर येथील तरुणाचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Ingole

अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गस्तीवरील असणाऱ्या पोलिसांमुळे उघडकीस आली.

Murder : एखतपुर येथील तरुणाचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून

सांगोला - अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास गस्तीवरील असणाऱ्या पोलिसांमुळे उघडकीस आली. ही घटना एखतपुर शिवारामधील एखतपुर- आचकदाणी रोडवर १४ जानेवारी रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास उघडकीस आली. संजय तुकाराम इंगोले (रा. एखतपुर, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मृत व्यक्तीचा भाऊ सुनील तुकाराम इंगोले (रा. एखतपुर, ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा लहान भाऊ संजय तुकाराम इंगोले हा आईसह एखतपुर ते आचकदानी जाणाऱ्या रोडवरील टाक्याचे मळ्याजवळ असणाऱ्या शेतात राहतात. 14 जानेवारी रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास फोन आल्याने त्यांना याबाबत माहिती मिळाली. संजय इंगोले हा त्यांच्या शेताजळील डांबरी रोडवर निपचित पडलेला दिसून आला. त्याच्या गुप्तांगाजवळ, हाताच्या कोपऱ्याजवळ अज्ञात व्यक्तीने अज्ञात हत्याराने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते. त्याला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केली असता वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

पोलिसांच्या गस्तीमुळेच समजली घटना -

सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी एखतपुर ते अचकदाणी रोडवर शनिवारी पहाटे दोोच्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आचकदाणी रोडलगत एक तरुण मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता खूनाच्या संशयित सदर घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, हेमंतकुमार काटकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे यांनी घटनेस्थळी येऊन पाहणी केली.

या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. याबाबत संपूर्णपणे चौकशी करून घटनेचा उलगडा निश्चितपणे केला जाईल.

- अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, सांगोला.

टॅग्स :crimemurderYouthsangola