
सोलापूर : चुलत वहिनीसोबत पळून जाऊन कायमचेच एकत्र राहायचा निशांत सावत याने प्लॅन केला. त्यासाठी निशांतने यू-ट्यूबवर क्राईम पेट्रोल, सीआयडी मालिकेचे अनेक भाग पाहिले. त्यानंतर त्याने गोपाळपूर परिसरातून एका मनोरुग्ण महिलेला दुचाकीवरून पाटखळ (ता. मंगळवेढा) येथे आणले. १२ जुलैला गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह घराजवळील पडक्या घरात ठेवला. १४ जुलैला घराजवळील कडब्याच्या गंजीत मृतदेह पेटवून दिला आणि प्रेयसी किरणने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.