

Viral post “Kyu Pade Chakkar Mein, Koi Nahi Takkar Mein” ignites political debate in Mangalwedha.
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा: सध्या तालुक्याच्या राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले, भारतीय जनता पार्टीत अनेकांचा प्रवेश होऊ लागला. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिका अगोदर होणार की जिल्हा परिषद अगोदर होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय निवडणूक भाजप विरुद्ध समविचारी आघाडी होणार की अन्य कोणती आघाडीत होणार यावर चर्चा सुरू असताना आ.समाधान आवताडे यांच्या समर्थकानी सोशलमीडियात क्यू पडे चक्कर में कोई नही टक्कर में या पोष्टची मात्र तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.