Solapur Accident: 'नान्नजच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याचा अखेर मृत्यू'; दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने अपघात
Tragic End: नान्नज येथील शेतकरी अरुण गुजरे यांची नान्नज बीबी दारफळ रस्त्यानजीक द्राक्षशेती असून, दुग्ध व्यवसायही करत होते. रविवारी (ता. १७) सायंकाळी दुचाकीवर ते शेतातून दूध घेऊन घराकडे येताना, दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्यामुळे त्यांची दुचाकी घसरली.
उत्तर सोलापूर: शेतातून सायंकाळी घराकडे जाताना दुचाकीच्या समोर कुत्रा आडवा आल्याने शेतकऱ्याला अपघात झाला. चार दिवसांच्या उपचारानंतर शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अरुण सिद्राम गुजरे (वय ४६) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.