esakal | आमदार शिंदेंच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक : माजी आमदार पाटील | Solapur News
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार शिंदेंच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक : माजी आमदार पाटील

माजी आमदार पाटील म्हणाले, आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर मोफत खते, बेणे देतो असे सांगितले. परंतु, त्यांचे आधार व सातबारा उतारे वापरून विनासंमती कर्ज काढले.

आमदार शिंदेंच्या कारखान्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक : माजी आमदार पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जेऊर (सोलापूर) : आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन कारखान्याने करमाळा तालुक्‍यातील (Karmala Taluka) शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर काढलेले बोगस कर्जप्रकरण मिटवताना शिंदे व संबंधित बॅंका शेतकऱ्यांची आणखी फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत. मागील आठवड्यात पुन्हा एकदा शेतकऱ्याला संबंधित बॅंकेने नो ड्यूज दाखला पाठवून दिला आहे. बॅंकेचा हा नो ड्यूज दाखला घेऊन विठ्ठल कॉर्पोरेशनचे चिटबॉय, कर्मचारी शेतकऱ्यांना हा दाखला देत आहेत व एका कागदावर 'आमची विठ्ठल कॉर्पोरेशनबद्दल कसलीही तक्रार नाही' असा उल्लेख असलेल्या मजकुराखाली सही घेत आहेत, असा आरोप शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: पोटच्या मुलानेच केला आईचा खून! बार्शी शहरातील घटना

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, आमदार संजय शिंदे यांनी करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर मोफत खते, बेणे देतो असे सांगितले. परंतु, शेतकऱ्याला खते देणे तर दूरच, त्यांचे आधार व सातबारा उतारे वापरून विनासंमती कर्ज काढले. शेतकऱ्यांच्या हातात बॅंकांनी पाठवलेली कर्जफेडी संदर्भातील जप्ती नोटीस हाती पडल्याने हा प्रकार उजेडात आला. यानंतर आमदार शिंदे यांनी सावरासावर करत संबंधित बॅंकेशी वन टाईम सेटलमेंट (एक रकमी परतावा) करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून, परत एकदा शेतकऱ्यांची कारखान्याकडे पूर्वी जमा असलेली कागदपत्रे पुन्हा एकदा वापरून त्यावर इतर बॅंकांकडून नवीन कर्ज काढण्यासाठी होत असावा, अशी दाट शक्‍यता आहे. शेतकरी मागणी करत नसताना त्यांना हा दाखला देण्यामागचा बॅंकेचा उद्देश काय आहे? याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी. या नो ड्यूज दाखल्यावर संजय शिंदे यांच्या कारखान्याने उचललेले कर्ज हे पीककर्ज होते, असा उल्लेख आहे. त्यामुळे यातील सर्व प्रकार हा पूर्ण फसवणुकीचाच आहे, हे सिद्ध होते, असेही आमदार पाटील म्हणाले.

हेही वाचा: तीन लाखांच्या 'मकाऊं'चा मृत्यू! धाराशिवकरांनी वाहिली श्रद्धांजली

मागणी नसताना नो ड्यूज दाखला!

मागील काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्‍यातील चंद्रकांत अंबारे व समाधान अंबारे (रा. गौंडरे) तसेच भाऊसाहेब बिरमल तांबे, अजिनाथ दत्तात्रय बंडगर, सुनीता रामचंद्र शिंदे, यहंमद हमद सय्यद, शहागीर मुसा पटेल, कलावती गोविंद शिंदे (सर्व रा. आवाटी) या शेतकऱ्यांनी युनियन बॅंक, शाखा सोलापूर यांच्याकडून नो ड्यूज दाखला मागणी न करता विठ्ठल कॉर्पोरेशन कारखान्याचे कर्मचारी घरी जाऊन दाखला देत असल्याचा प्रकार घडला असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top