esakal | शरद पवार, अजित पवारांपेक्षाही सध्या फडणवीस पॉवरफुल्ल नेते : नरेंद्र पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra_Patil

शरद पवार व अजित पवारांच्या तुलनेत फडणवीस यांची लोकप्रियता आणि काम करण्याची पद्धत खूप वेगळी असल्याचे वक्‍तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज सोलापुरात केले. 

शरद पवार, अजित पवारांपेक्षाही सध्या फडणवीस पॉवरफुल्ल नेते : नरेंद्र पाटील

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मी खूप वर्षे काम केले. मात्र, त्या दोघांच्याही तुलनेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत वेगळी आणि लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळाले. पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांपेक्षाही त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. दोन्ही पवारांच्या तुलनेत फडणवीस यांची लोकप्रियता आणि काम करण्याची पद्धत खूप वेगळी असल्याचे वक्‍तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज सोलापुरात केले. 

कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे नेते अनंत जाधव यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या पक्षातील लोकांना मोठे करण्याला प्राधान्य दिले. मात्र, फडणवीस यांनी सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दरम्यान, मनसुख हिरेन या गरिबाची हत्या झाली. विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा सुरू असताना त्यांचा खून होतो, हा विषय खूपच गंभीर आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कागदपत्रे मिळाली नाहीत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कागदपत्रे मिळवली आणि सर्व प्रकार समोर आणला. यावर एक स्पष्ट होते, की आजही प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फडणवीस यांचा वचक असून त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांच्या माध्यमातून निश्‍चितपणे सचिन वाझे, मनसुख हिरेन, दरमहा 100 कोटींची मागणी या सर्व प्रकरणांची वस्तुस्थिती जनतेसमोर काही दिवसांत येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

नरेंद्र पाटील म्हणाले... 

  • मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केले काम 
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याच कामांना दिले प्राधान्य 
  • देवेंद्र फडणवीस असा नेता आहे, ज्यांनी पक्षापेक्षाही समोरील व्यक्‍तीच्या गरजेला दिले प्राधान्य 
  • मनसुख हिरेन याच्याबद्दल अधिवेशनात चर्चा सुरू असताना, त्याचा खून झाल्याची बाब धक्‍कादायक 
  • जी कागदपत्रे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना मिळत नाहीत, ती कागदपत्रे विरोधी पक्षनते फडणवीस यांना मिळतात 
  • अधिकाऱ्यांसह जनतेला अजूनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर व आत्मविश्‍वास वाटतोय 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image