esakal | नरेंद्र पाटील म्हणाले, अशोक चव्हाणांमुळे मराठा आरक्षणाला बसला धक्का ! फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये करणार प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Patil

मागील सरकारच्या कालावधीतील लोकांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. माझ्या विरोधात देखील मुख्यमंत्र्यांना भडकावण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले, असे वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. 

नरेंद्र पाटील म्हणाले, अशोक चव्हाणांमुळे मराठा आरक्षणाला बसला धक्का ! फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये करणार प्रवेश

sakal_logo
By
विश्वभूषण लिमये

सोलापूर : मागील सरकारच्या कालावधीतील लोकांना बाजूला सारण्याचे काम महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. माझ्या विरोधात देखील मुख्यमंत्र्यांना भडकावण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरले, असे वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. 

नरेंद्र पाटील यांनी काल आपण शिवसेना सोडत असल्याचे जाहीर केले होते. शिवसेना सोडल्याच्या कारणांचा खुलासा पाटलांनी आज सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला. 

देवेंद्र फडणवीस यांनी मी राष्ट्रवादीत असताना देखील माझी महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरून मी शिवसेनेकडून खासदारकी लढवली. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते; मात्र त्यांनी जाणीवपूर्वक महामंडळ बरखास्त केले. असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले. तसेच यापुढे भाजपसाठी काम करणार असून, देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश होईल, असे देखील नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, प्रवासात असताना योगायोगाने उदयनराजे भोसले यांची भेट झाली. राज्यातील अस्थिर वातावरण पाहता स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा, असे मी मनमोकळेपणाने बोललो. पण पहाटेचा शपथविधी होणार की दुपारचा शपथविधी होणार हे मी सांगू शकत नाही. कोणतेही तर्कवितर्क लावायला मी काही ज्योतिष नाही. सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील भावना मी व्यक्त केली, असे स्पष्टीकरण नरेंद्र पाटील यांनी दिले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरून नरेंद्र पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला धक्का लागला. आरक्षण देण्यामध्ये शिवसेना ही भाजपसोबत होती. मात्र महाविकास आघाडीत अशोक चव्हाण यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. मराठा समाजातील विविध संघटनांसोबत सोबत घेणे ही अशोक चव्हाणांची जबाबदारी होती. मात्र न्यायालयाकडून स्थगिती मिळेपर्यंत त्यांनी कोणालाही जवळ केले नाही, असा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

loading image