

Nashik Akkalkot Highway Project Hits Land Acquisition Hurdle In Ahilyanagar Despite Progress In Solapur And Dharashiv
sakal
सोलापूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संपादन प्रक्रिया रखडल्याने नाशिक ते अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग वर्षभरापासून रखडला आहे. नाशिक ते अक्कलकोट या ३७४ किमी महामार्गासाठी ऑगस्ट महिन्यात निविदा उघडण्यात येणार होती, पण संपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील संपादन प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असली तरी एका जिल्ह्यातील संपादन प्रक्रिया रखडल्याने नाशिक ते अक्कलकोट (सुरत-चेन्नई) महामार्गाचे काम पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.