अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!

अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!
अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!
अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!Canva
Summary

"राष्ट्रवादी आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत "नागरिकांचा जनता दरबार' अभियानाचा प्रारंभ सोमवारी अक्कलकोट येथे होणार आहे.

सोलापूर : "राष्ट्रवादी आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत "नागरिकांचा जनता दरबार' (Janata Darbar) अभियानाचा प्रारंभ सोमवारी (ता. 2) सकाळी 10.10 वाजता अक्कलकोट (Akkalkot) येथील कांतीमाता विजयसिंह राजेभोसले मंगल कार्यालयात होणार आहे. तालुक्‍यातील सहा जिल्हा परिषद गट व तीन नगरपालिकांमध्ये दोन दिवस नागरिकांचा जनता दरबार होणार आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे (Former MLA Deepak Salunkhe) यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (NCP District Executive President Umesh Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nationalist Congress Party organizes Janata Darbar in Akkalkot on Monday-ssd73)

अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!
कोरोना नियमांचं उल्लंघन! आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद गट व 11 नगरपालिका क्षेत्रात उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या जनता दरबारमध्ये उपस्थित राहून ते नागरिकांची निवेदने उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावतीने स्वीकारतील. अक्कलकोटमधील जनता दरबारचे नियोजन तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष मनोज निकम यांच्या माध्यमातून केले जात आहे. या उपक्रमाच्या प्रारंभास राष्ट्रवादीचे निरीक्षक सुरेश घुले, आमदार यशवंत माने, उत्तम जानकर, कल्याणराव काळे, भारत जाधव, महेश कोठे, संतोष पवार, भगीरथ भालके, मानाजी माने, दिलीप कोल्हे, रमेश बारसकर, तौफिक शेख आदी उपस्थित राहणार आहेत.

अक्कलकोटमध्ये सोमवारी "नागरिकांचा जनता दरबार'!
ड्रॅगनफ्रूट लागवडीला 40 टक्के अनुदान ! जाणून घ्या या फळाचे महत्त्व

असा असेल दौरा

उद्‌घाटन समारंभानंतर त्याच ठिकाणी नागरिकांची निवेदने स्वीकारली जातील. दुपारी 2 मैंदर्गी, दुपारी 4 दुधनी व सायंकाळी 5 सलगर येथे दरबार होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. 3) सकाळी 10.10 वाजता चपळगाव, दुपारी 1 वागदरी, दुपारी 4 नागणसूर, सायंकाळी 5 तडवळ व सायंकाळी 6:30 जेऊर येथे दरबार होईल.

तहसील कार्यालय, पंचायत समिती, महावितरण यांच्याकडील विषय, पीककर्ज व कर्जमाफीसह सर्वसामान्यांना, शेतकरी, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांना स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर भेडसावणाऱ्या प्रश्‍नांची सोडवणूक जनता दरबारच्या माध्यमातून केली जाणार आहे. या उपक्रमात निवेदने स्वीकारून ती उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडे दिली जाणार आहेत.

- उमेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com