Navratri Festival 2023 : सोलापूर नवरात्र महोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

धाम मंदिराची भव्य प्रतिकृतीचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे
solapur
solapur sakal
Updated on

पंढरपूर - पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये नवरात्र महोत्सव मोठ्या आनंदात व भक्तिभावात साजरा करण्यात येत आहे. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने यंदा क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीने बद्रीनाथ धाम मंदिराच्या प्रतिकृतीचा तर शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या वतीने हिरण्यकश्यपू वधाचा पौराणिक हलता देखावा उभारण्यात आला आहे. हे देखावे पाहण्याकरिता पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

पंढरीमध्ये यावर्षी ३८ नवरात्र उत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. बहुतांश नवरात्रोत्सव मंडळाच्या वतिने आकर्षक विद्युत रोषणाईचे देखावे आणि धार्मिक तसेच पौराणिक कथेवर आधारित हलते देखावे सादर केले आहेत.

येथील केबीपी कॉलेज चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीने बद्रीनाथ धाम मंदिराची भव्य प्रतिकृतीचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. ६० फूट रुंद, जवळपास १०० फुट लांब व ३५ फूट उंच असलेल्या या देखाव्याचा शुभारंभ आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली.

यावेळी मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक संतोष नेहतराव यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अमोल नागटिळक, बाळासाहेब नेहतराव, सुरेश नेहतराव, मंडळाचे अध्यक्ष निखील नेहतराव, उपाध्यक्ष अमोल आबा परबतराव, सचिव श्रीकांत शिंदे, खजिनदार किरण माने आदी उपस्थित होते. बद्रीनाथ धाम मंदिराचा भव्य देखावा पाहण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच नागरिकांची गर्दी होत आहे.

solapur
Solapur News : ‘एमआयडीसी’तील ७९ उद्योग बंद चिंचोलीत ३४ वर्षांपासून १४५ प्लॉट रिकामेच

दरम्यान भादुले चौक परिसरातील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या वतीने यंदा श्रीविष्णूच्या नृसिंह अवतारातील हिरण्यकश्यपू वधाचा पौराणिक हलता देखावा उभारण्यात आला आहे. या हलत्या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर हिरण्यकश्यपू राजाच्या वधाची कथा देखील सांगण्यात येत आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांबरोबरच श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक देखील गर्दी करत आहेत.

solapur
Solapur : सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ; मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना

क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती बघून प्रत्यक्ष बद्रीनाथ येथे जाऊन बद्रीनाथाचे दर्शन घेतल्याची भावना मनात निर्माण झाली.- मोहिनी शिंगटे, पंढरपूर * बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी देवी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त होम मिनिस्टर स्पर्धेसह, दांडिया स्पर्धा व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.- निखील नेहतराव, अध्यक्ष, क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com