Ajit Pawar : मराठा आंदोलन पेटणार? माढ्यात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, एक जण ताब्यात

अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
NCP Ajit Pawar was shown black flags by Maratha protesters at Madha maratha reservation
NCP Ajit Pawar was shown black flags by Maratha protesters at Madha maratha reservation
Updated on

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार संबोधनासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरु होताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. यानंतर आपण २५ तारखेपासून कठोर अमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यादरम्यान राज्यातील अनके गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय देखील घेण्यात येत आहेत.

NCP Ajit Pawar was shown black flags by Maratha protesters at Madha maratha reservation
''कुणबी प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी नको, मराठा म्हणून आरक्षण द्या'', मराठा क्रांती मोर्चाची वेगळी भूमिका

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील माढा लोकसभा मतदार संघात बंदी घातल्याचीघोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्या पार्श्वभुमिवर कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा आंदोलक अजित पवार यांना दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे, सभेच्या ठीकाणी कारखाना परीसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच सभेच्या ठीकाणी शेतकऱ्यांचे रुमाल आणि मोबाईल फोन तपासूनच प्रवेश देण्यात आला होता.

NCP Ajit Pawar was shown black flags by Maratha protesters at Madha maratha reservation
Lalit Patil Drug Case : निवडणुकीच्या केंद्रस्थानी ड्रग्ज! दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून जुंपणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com