Omkar Hazare Suicide News : साेलापूर हादरलं! 'राष्ट्रवादीचे सरचिटणीस ओंकार हजारेंनी जीवन संपवले'; वेगळचं कारण आलं समाेर..
Solapur Political Leader Suicide : २०१९ साली त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ, भावाची पत्नी व मुले असा परिवार आहे. हजारे मागील काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणामुळे नैराश्यात होते.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस ओंकार हजारे यांनी रविवारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सुपर मार्केटजवळील त्यांच्या स्वतःच्या चारचाकीत त्यांचा मृतदेह आढळला. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.