

AB Form Row Triggers Resignation of NCP’s Sudhir Kharatmal
sakal
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड महिन्यांपूर्वी दाखल झालेले सुधीर खरटमल यांनी मंगळवारी (ता. ३०) राजीनामा दिला. महापालिका निवडणूक प्रमुख असतानाही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परस्पर उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने नाराज होऊन त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठविला.