
NCP leaders addressing OBC community workers’ meeting in Solapur ahead of local body elections.
Sakal
-प्रमोद बोडके
सोलापूर : पाच आमदारांसह सोलापूरच्या राजकारणात भाजप सध्या बाहुबली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील पाच आमदारांच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यात सध्या परफेक्ट सामाजिक समतोल साधला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील अस्तित्व गमावले आहे. जिथे हरवले आहे, तिथेच शोधण्यासाठी राष्ट्रवादीने आगामी निवडणुकीसाठी संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सोपविली आहे. भाजपच्या सामाजिक समतोलाला एक प्रकारे आव्हान देणारे ओबीसी कार्डच राष्ट्रवादी काँग्रेसने कृषिमंत्री भरणे यांच्या रूपाने खेळल्याचे दिसत आहे.