पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार किंवा खासदार शिवसेनेत कसे जातील? ते अजितदादांच्या पक्षात जातील, असे विधान माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केले आहे..Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर.ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली आहे. सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षाचे पाच ते सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून तेही शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जानकर यांना विचारले असता ते म्हणाले, "आमच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील; ते शिवसेनेत जातील, असे मला वाटत नाही..सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीतून जात आहे. शरद पवारांचे वय आणि पक्षाची गती पाहता पक्षाच्या आमदार-खासदारांसमोर अनेक अडचणी आहेत. तसेच विरोधकांकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमच्याकडून कोणी फुटून त्यांच्याकडे जाईल, अशी सध्याच्या राजकीय परिस्थिती नाही," असेही आमदार जानकर यांनी स्पष्ट केले..दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यातच आमदार जानकर यांनी पक्षातील आमदार-खासदारांविषयी सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे..जानकर - सातपुते पुन्हा आमनेसामनेसोलापूर विधान परिषद निवडणुकीत आमदार उत्तम जानकर यांनी भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला असला, तरी आमदार जानकर आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्यातील राजकीय वैर कायम असल्याचे दिसून आले. आमदार जानकर यांचे मोहिते-पाटील यांच्यासोबत भांडण झाल्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. परंतु, आम्ही जानकर यांना स्वीकारत नाही. .Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा...पुन्हा जानकर-मोहिते एकत्र आले, तरी त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचा दावा राम सातपुते यांनी केला आहे. दुसरीकडे, राम सातपुते यांनी हायपर होण्याची गरज नाही. पक्ष त्यांची योग्य ठिकाणी सोय करेल, असा पलटवार आमदार जानकर यांनी केला आहे. पक्षाच्या मनात आले, तर राम सातपुते यांना राज्यपाल करेल; ते नाही करता आले, तर द्वारपाल मात्र नक्की करेल. अशा छोट्या कार्यकर्त्याबद्दल माझ्यासारख्याने जास्त बोलणे उचित होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.