

Alleged Assault Leads to NCP Worker’s Death; Investigation Underway
सोलापूर: करणी केल्याचा तोड म्हणून भंडारा उधळल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीनंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. दशरथ अमोगसिद्ध शेंडगे (वय ४०, रा. भारतरत्न इंदिरा नगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी चौकशी व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.