
सोलापूर : जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्यामुळे नाराज झालेल्या बळिराम साठे यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी (ता. १४) भेटीसाठी मुंबईला बोलावले आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सुटणार की साठे वेगळ्या राजकीय मार्गावर जाणार, हे स्पष्ट होणार आहे.