
सोलापूर : विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाल्याने विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या असून या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नावाची तर शिवसेनेकडून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.