
सोलापूर : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी) शेतकऱ्यांची संमती घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी दिली. त्यामुळे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने रद्द झालेली एमआयडीसी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांनी पुन्हा होणार हे स्पष्ट झाले आहे.