Solapur : नीरा देवधर प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू : उपमुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : नीरा देवधर प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करू : उपमुख्यमंत्री

निमगाव : माळशिरस तालुक्याच्या १६ गावांसाठी व फलटण, खंडाळा, भोर तालुक्यातील कायम दुष्काळी गावांसाठी वरदान ठरलेल्या निरा देवधर प्रकल्पाच्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव निधीची तरतूद करून हा प्रकल्प मार्गी लावू , असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पंढरपूर येथे पाणी हक्क समितीच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील उपस्थित होते.

या शिष्टमंडळामध्ये भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व निरा देवधर पाणी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आकाश सावंत, गणेश सीद, अमोल वाघमोडे यांचा समावेश होता.

गेल्या अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. परंतु, २०१९ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना या योजनेच्या कामासाठी बंद पाईपलाईनमधून पाणी देण्याच्या योजनेला मंजुरी दिली होती. २०१९ ला राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सरकार आले. मात्र या सरकारने या प्रकल्पासाठी मदत केली नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला गेला.

राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिंदे फडवणीस सरकार सत्तेत आल्याने या प्रकल्पाच्या निधीसाठी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यावेळी या प्रकल्पासाठी निधी देण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.