esakal | कोरोना : ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

Negligence of government employees in Solapur district

राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात व तालुक्यात पुणे, मुंबई, ठाणे, देशाच्या इतर भागातून व परदेशातून नागरिक गावी परतले आहेत. प्रत्येक गावामध्ये त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. यात असलेल्या महिला, पुरूष, बालकामध्ये ते कधी आले.

कोरोना : ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेरगावहून नागरिक मोठ्या प्रमाणात आले आहेत. परंतु याबाबत प्रशासनाकडे निश्चित आकडेवारीच उपलब्ध नाही. आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नियुक्त कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे याची माहिती संकलित कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात व तालुक्यात पुणे, मुंबई, ठाणे, देशाच्या इतर भागातून व परदेशातून नागरिक गावी परतले आहेत. प्रत्येक गावामध्ये त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. यात असलेल्या महिला, पुरूष, बालकामध्ये ते कधी आले. यापैकी या रोगाशी संबधित असलेली लक्षणे आहेत का? कुणाला याबाबत त्रास होतो का? याची माहिती प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाने गाव पातळीवर नियुक्त ग्रामसेवक, तलाठी हे कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्यामुळे याची सर्व माहिती संकलित कोणी करायची असा प्रश्न उभा आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना देखील हे कर्मचारी मुख्यालयात दिसून येत नाहीत. तर आरोग्य खात्याकडे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना देखील आरोग्य विभागाने आशासेविका त्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून त्याबाबत प्रबोधन करत आहेत. गावोगावचे पोलिस पाटीलही सतर्क आहेत. पण परगावहून नागरिकाच्या माहितीसाठी अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व ग्रामसेवकाच्या ठिकाणी संबधित गावी नियुक्त असलेले कृषी, शिक्षण या खात्यातील कर्मचाय्राच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन व माहिती संकलित व्हावी. जनतेमध्ये असलेले भितीचे सावट कमी होईल. सध्या प्रशासनाकडे बाहेरून आलेली आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे नेमक्या कोणत्या घरी जाऊन काय उपचार करायचे आणि हा प्रश्न आरोग्य खात्यात समोर उभा आहे. त्यासाठी गाव निहाय आकडेवारी ग्रामपंचायतमध्ये व शहराची आकडेवारी पालिकेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु गावनिहाय कर्मचारी हे मुख्यालयात नसल्यामुळे याबाबत निर्धास्त असलेली ग्रामीण जनता आलेल्या लोंढ्यामुळे भितीच्या सावटाखाली आहे.

कार्यशाळा घेतली
कोरोना रोगावर उपचार नसला तरी प्रतिबंध मात्र आपल्या हातात आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पार पडली तरी काही करू शकणार नाही. आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणात पद्धत असली तरी अशा सेविका व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात लक्ष ठेवून आहे. प्रबोधनासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन त्यांना सूचना दिल्या आहेत.
- नंदकुमार शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी

आज माहिती मिळणार
शहरांमध्ये इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत नागरिकांची माहिती पूर्ण होऊ शकेल.
- पल्लवी पाटील, मुख्याधिकारी, मंगळवेढा नगरपालिका