

“Ambedkar’s legacy is our guiding light,” says Kulshrestha during impactful address
Sakal
सोलापूर : राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांना जातीपातीत विभागू नका. डॉ. आंबेडकरांमुळे संविधानात भारतीय संस्कृती प्रतिबिंबित झाली. संविधानाच्या २२ प्रकरणांतील चित्रांतून ती प्रतीत होते. डॉ. आंबेडकरांचे उपकार कधीही विसरू नका. मात्र, आज काही जातियवादी मंडळी डॉ. आंबेडकरांच्या विरोधात मोहीम चालवत आहेत, हे संतापजनक आहे, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार आणि भारताच्या इतिहासाचे अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी मांडली.