
सोलापूर : गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यासाठी आरोग्य सेविका व अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक गर्भवती महिलेवर नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.