
पंढरपूर : येथील चंद्रभागा नदीवरील सोलापूर मार्गावरील नवीन पुलाशेजारी असलेला धोकादायक जुना दगडी पूल काढून त्या ठिकाणी नवीन समांतर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी येत्या काही महिन्यात शासन मान्यता मिळेल. त्यानंतर पुढच्या वर्षी नवीन पुलाचे काम सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.