मोहोळ - चिखली, ता. मोहोळ येथे बुधवार ता. 13 रोजी कचऱ्याच्या ढिगार्यात जिवंत पुरुष जातीचे अर्भक मिळून आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष मते, पोलीस पाटील विठ्ठल मते, मंथन शिरसट, संभाजी जाधव यांच्यासह अन्य नागरिकांनी त्याला तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.