'या' गावातील एकाच कुटुंबातील सहाजण कोरोनाबाधित !

Corona
Corona
Updated on

निमगाव (सोलापूर) : दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. निमगाव (ता. माळशिरस) येथील एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. या कुटुंबातील एका सदस्याचा संपर्क बऱ्याच ठिकाणी असल्याने निमगावकर मात्र चांगलेच धास्तावले आहेत. 

विदेशातून भारतात आलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग शहरांसह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत आहे. काही दिवसांपूर्वीच निमगावमध्ये बाहेरून आलेली एक व्यक्ती कोरोना बाधित सापडली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, बुधवार रोजी एक रुग्ण बाधित सापडला. या रुग्णास माळशिरस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने या रुग्णाच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे स्वॅब घेऊन सोलापूर येथे तपासणीसाठी पाठवले असता, पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कुटुंबातील एक सदस्य बऱ्याच नागरिकांच्या संपर्कात आला आहे, त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे असणार आहे. निमगावमध्ये एकाच वेळी सहा कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे निमगाव व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले, की कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. कोरोनापासून रक्षणासाठी मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करावा. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. अफवा पसरवू नये व अफवांवर विश्‍वास ठेवू नये. घरातच राहा. काळजी घ्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Rain Update Ujani Dam Almost Full 40000 Cusecs Released Through 16 Gates into Bhima River
POCSO Case
solapur
dogs
Marathi News Esakal
www.esakal.com