
सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १३) जीबीएसचे ११ रुग्ण आढळून आले आहेत. यातील नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला आहे. या आजाराबाबत आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.