सोलापूरसह चार जिल्ह्यातील नऊ हजार स्वस्त धान्य दुकाने होणार आयएसओ

राज्यात व अन्य भागात कोणीही उपाशी राहू नये, त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला स्वस्त धान्य मिळावे. यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली आहे.
ration shop
ration shopsakal
Summary

राज्यात व अन्य भागात कोणीही उपाशी राहू नये, त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला स्वस्त धान्य मिळावे. यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली आहे.

मोहोळ - सोलापूरसह (Solapur) अन्य चार जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने, (Ration Shop) तहसील कार्यालये व धान्य साठवणुकीची गोदामे (Godown) आयएसओ (ISO) करण्यासाठी मूळचे पापरीचे रहिवासी व सध्या पुणे येथे कार्यरत असणारे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी (Trigun Kulkarni) यांनी कंबर कसली आहे. हे सर्व काम १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

उपायुक्त कुलकर्णी म्हणाले, राज्यात व अन्य भागात कोणीही उपाशी राहू नये, त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला स्वस्त धान्य मिळावे. यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांची निर्मिती केली आहे. मात्र, सध्या स्वस्त धान्य दुकानाकडे बघण्याची सर्वसामान्यांची मानसिकता चांगली नाही. स्वस्त धान्य दुकान म्हणजे काळाबाजार व भ्रष्टाचाराचा अड्डा असा सर्वसामान्यांचा समज आहे. ग्रामीण भागातील अनेक धान्य दुकानात अस्वच्छता, जाळ्या, उंदराचे साम्राज्य असे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे उपायुक्त कुलकर्णी यांनी सांगितले. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर हे पाच जिल्हे उपायुक्त कुलकर्णी यांच्या आधिपत्याखाली येतात. यावेळी ते म्हणाले की, पाच जिल्ह्यात ९ हजार २५० स्वस्त धान्य दुकाने, ८५ तहसील कार्यालये व ८५ धान्य साठवणुकीची गोदामे आहेत.

ration shop
सोलापूरच्या प्रश्नांवर पंतप्रधांनाशी चर्चा; खासदार डॉ. महास्वामी

या सर्वांना आयएसओ मानांकनासाठी मी गेल्या महिन्याभरापासून कामाला सुरवात केली आहे. त्याला दुकानदाराकडून प्रतिसादही मिळत आहे. दुकानाची रंगरंगोटी करणे, दर फलक लावणे, अग्निशामक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट विजन कॅमेरे, अन्नभेसळ विभागाचा परवाना या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. सध्या नीटनेटकेपणाला महत्त्व आहे. स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारक माल घेण्यासाठी गेल्यास त्याला समाधान वाटले पाहिजे. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात शॉप ॲक्‍ट परवाना हा आवश्‍यक असून, धान्य दुकानाचा परवाना ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण झाला पाहिजे, तसेच दुकानात पिण्याचे स्वच्छ पाणी ठेवण्यासंदर्भात ही दुकानदारांना सूचना दिल्या आहेत..

तहसील कार्यालये होणार स्मार्ट

५ जिल्हा पुरवठा अधिकारी, दोन अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी या कामाला सुरवात केली आहे. सर्व गोदामे स्वच्छ करून त्यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. पाच जिल्ह्यात ८५ तहसील कार्यालये आहेत, अपवाद वगळता त्यांचीही अवस्था बरी नाही ती स्मार्ट करण्यासाठी सर्व तहसीलदारांना सूचना दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com