

Union Minister Nitin Gadkari announces major highway expansion project for Solapur district.
Sakal
सोलापूर: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बीच्या भुरीकवठे - वागदरी- अक्कलकोट- नागणसूर- तोळणूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या ४७ किमीच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने ३५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव महामार्ग विभागाने केंद्रास चार महिन्यांपूर्वी सादर केला होता. यामुळे आता ७ मीटरचा रस्ता १२ मीटर होणार आहे. सांगवी येथे नवीन पूल तर वागदरीला बाह्यवळण मार्गही होणार आहे.