सिद्धिविनायक, शिर्डी सुटले; कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?

सिद्धिविनायक अन्‌ शिर्डी सुटले, मग कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?
सिद्धिविनायक अन्‌ शिर्डी सुटले, मग कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?
सिद्धिविनायक अन्‌ शिर्डी सुटले, मग कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?Sakal
Summary

कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या पंढरपूर देवस्थानवर मात्र का नियुक्ती होत नाही? ही नियुक्ती का रखडली? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकारातून आणि इच्छेनुसार राज्यात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे (Congress) महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) सत्तेत आले. सरकार आले, मंत्रिमंडळ झाले पण इतर सत्ता वाटपाचे गणित कसे असणार? याचे कोडे मात्र अद्यापही कायम आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सिद्धिविनायक देवस्थानवर (Siddhivinayak Devasthan) आदेश बांदेकरांची (Adesh Bandekar) नियुक्ती झाली. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या शिर्डी साई संस्थानवर (Shirdi Sai Devasthan) कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांची नियुक्ती झाली. कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या पंढरपूर देवस्थानवर मात्र का नियुक्ती होत नाही? ही नियुक्ती का रखडली? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

सिद्धिविनायक अन्‌ शिर्डी सुटले, मग कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?
तुमचं सगळं ठिकाय... पन, 'लक्ष्मी'दर्शनाचं कसं?

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना पूर्वी भाजप- शिवसेना सरकारमध्ये व आता महाविकास आघाडी सरकारमध्येही सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्षपद मिळाले आहे. शिर्डीच्या साई संस्थांनवर कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती झाली आहे. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आले आणि सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना ही संधी मिळू शकते, या शक्‍यता सुरू झाल्या. सलग तीन टर्म आमदार होऊनही मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या आमदार शिंदे यांना किमान राज्यमंत्री दर्जाच्या पदावर तरी संधी मिळेल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे.

सिद्धिविनायकसाठी शिवसेनेने जसे प्रयत्न केले, शिर्डीसाठी राष्ट्रवादीने जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न पंढरपूरसाठी कॉंग्रेस करत नाही का? की महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीपुढे कॉंग्रेसचेच काही चालत नाही? हे प्रश्‍न रखडलेल्या नियुक्तीतून उपस्थित होऊ लगाले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्यानंतर हे पद सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नेत्याला मिळू शकते? याचा विचार केल्यास ज्येष्ठत्वाच्या मुद्‌द्‌यावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे नाव प्रथम प्राधान्याने समोर येते. सध्या म्हेत्रे प्रचंड अडचणीत आहेत. त्यांच्या मातोश्री लक्ष्मी शुगरने थकविलेल्या एफआरपीसाठी शेतकरी सोलापुरातील कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाला बसले आहेत. म्हेत्रे यांच्या या प्रश्‍नात सोलापूरची कॉंग्रेस सध्या त्यांच्या सोबत दिसत नाही, मग पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदासाठी सोलापूरची कॉंग्रेस म्हेत्रे यांच्यासोबत राहणार का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री म्हेत्रे यांच्याशिवाय सोलापूरच्या कॉंग्रेसमध्ये सध्या तरी कोणतेही सक्रिय माजी मंत्री अथवा माजी आमदार राहिलेले नाहीत, हे कॉंग्रेसचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सिद्धिविनायक अन्‌ शिर्डी सुटले, मग कॉंग्रेसच्या वाट्यातील पंढरपूर का लटकले?
'अधिवेशनात भाजप वाघासारखा तुटून पडेल अन्‌ सरकार नांगी टाकेल!'

कॉंग्रेस करणार का धाडस?...

पंढरपूरसाठी आषाढी आणि कार्तिकी वारी महत्त्वाची समजली जाते. कार्तिकी वारी जवळ आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदावर आपला माणूस बसविण्यासाठी कॉंग्रेस पुढाकार घेणार का? आमदार शिंदे, माजी मंत्री म्हेत्रे असोत की सोलापूर जिल्ह्याबाहेरील युवा किंवा ज्येष्ठ नेत्याला पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदावर बसविण्यासाठी कॉंग्रेस आग्रही भूमिका मांडणार का? यावर सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अस्तित्व आणि भविष्य अवलंबून आहे हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com