शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश नाहीच? ‘शाळा व्यवस्थापन’ला निधीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Uniforms
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश नाहीच? ‘शाळा व्यवस्थापन’ला निधीच नाही

शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश नाहीच? ‘शाळा व्यवस्थापन’ला निधीच नाही

सोलापूर : यंदा जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी (१३ जून) गणवेश मिळावा, असे शासनाचे आदेश आहेत. गणवेशाचा निधी प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन समितीला निधी देणे अपेक्षित आहे. पण, मागील आठ-नऊ दिवसांत तो निधी मिळाला नसल्याने आता अवघ्या ३० दिवसांत सर्व गणवेशाचे कापड व रंग ठरवून त्याची शिलाई करून घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समित्यांसमोर आहे.

हेही वाचा: विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर

महापालिका, झेडपी, नगरपालिका शाळांमधील सर्व मुलींना आणि अनुसूचित जाती-जमातीसह दारिद्र्यरेषेखालील मुलांनाच मोफत गणवेश दिले जातात. जिल्ह्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी यंदा आठ कोटी ९० लाख ४३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यंदा एक लाख दोन हजार ८०४ मुलींना आणि ४५ हजार ६०१ मुलांना गणवेश मिळणार आहे. गणवेश योजना थेट लाभ हस्तांरण (डीबीटी) प्रक्रियेतून वगळली आहे. गणवेशाचा निधी आता शिक्षणाधिकाऱ्यांकडून थेट संबंधित शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या बॅंक खात्यात वर्ग केला जातो. प्रत्येक मुलाच्या दोन गणवेशासाठी सहाशे रुपये दिले जाणार आहेत. त्यावेळी त्या समितीने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा रंग ठरवायचा आहे किंवा पूर्वीचाच रंग तसाच ठेवायचा असल्यास समिती तसेही करू शकते. पण, गणवेशाचे कापड दर्जेदार असणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापन समितीला पैसे मिळाल्यानंतर शिलाईचा ठेका दिला जाणार आहे. अजूनपर्यंत गणवेशाची रक्कम न मिळाल्याने ही सर्व प्रक्रिया थांबलेलीच आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळेल की नाही, याबाबत शाळा व्यवस्थापन समित्या ठामपणे सांगू शकत नाहीत.

हेही वाचा: ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत

शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीतील एक लाख ४८ हजार ४०५ मुलांना गणवेश दिले जातील. पुढील आठवड्यात गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. यंदा मुलांना प्रत्येकी दोन गणवेश मिळतील.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

हेही वाचा: विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर

  • गणवेशाबद्दल ‘शाळा व्यवस्थापना’ला सूचना
    - व्यवस्थापन समितीला गणवेशाचा रंग ठरविणे, गणवेश शिलाई करून देण्याचा अधिकार
    - शिलाई दर्जेदार असावी, गणवेश फाटल्यास शाळा व्यवस्थापन समिती असेल जबाबदार
    - शिलाई पक्क्या धाग्याची आवश्यक असून टिकाऊ गणवेश असणे अपेक्षित
    - गणवेशाच्या खर्चाचा हिशेब ठेवणे बंधनकारक, ज्यादा खर्च करता येणार नाही

Web Title: No Uniform On The First Day Of School School Management Has No

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top