
विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर
सोलापूर : दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांनाच आपले कुटुंब मानणाऱ्या परिचारिका रात्रंदिवस डॉक्टरांच्या आदेशानुसार ड्यूटी करतात. पण, माहेर-सासरची आर्थिक परिस्थितीत हालाखीची असतानाही संषर्घमय जीवन जगत त्या डॉक्टरांकडे पाहून त्या परिचारिकांनी स्वत:च्या मुलांचे स्वप्न पाहिले आणि त्यांना डॉक्टर बनविले. ही आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमधील स्मिता संजय चव्हाण यांची यशकथा.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
माहेरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी शिक्षण झाल्यानंतर स्मिता यांचा संजय चव्हाण यांच्याशी विवाह झाला. विवाहापूर्वीच त्यांच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता. स्मिता व संजय हे दोघेही परिस्थितीमुळे सोलापुरात राहात होते. संजय यांचे बारावीपर्यंच शिक्षण झाले होते, पत्नीला जॉब लागावा म्हणून त्यांनी मिळेल ते काम केले. विवाहानंतर स्मिता यांनी नर्स होण्यासाठी ‘जीएनएम’ला प्रवेश घेतला. १९९७ ते २००० या काळात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, निखिलचा सांभाळ करताना त्यांची पंचाईत व्हायची. अशावेळी त्यांनी निखिलला पाळणा घरात ठेवले. त्यानंतर त्याला लहान वयातच छोट्या गटातून शाळेत प्रवेश घेतला. स्मिता यांनी जीएनएमचा कोर्स पूर्ण केला आणि प्रशिक्षणही घेतले. २००४ मध्ये त्यांना जॉब मिळाला आणि त्यांना खूप मोठा आनंद झाला. त्यावेळी त्यांनी निखिलला डॉक्टर करायचेच, असे स्वप्न उराशी बाळगले. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेतला, पण निखिलच्या शिक्षणात काहीच कमतरता भासू दिली नाही. बारावीपर्यंत नेहमीच रॅंकिंगमध्ये आलेला निखिल डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार, याचा आत्मविश्वास त्यांना आला. निखिलला चांगले गुण मिळाले आणि त्याचा नंबर सोलापुरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच आला. आता निखिल एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांत आहे.
हेही वाचा: शाळांना सुटी अन् पोट भरण्यासाठी निराधार मुले मजुरीवर! सुटीत मिळत नाही पोषण आहार
ऑल इंडिया रॅंकमध्ये झळकला निखिल
पाळणा घरात काही दिवस वाढलेला निखिल निश्चितपणे डॉक्टर होणार हे स्वप्न स्मिता व संजय यांनी निखिल लहान असतानाच उराशी बाळगले होते. तो दिवस २०१९ मध्ये उजाडला आणि निखिल ऑल इंडिया रॅंकमध्ये १९ हजार क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला. संघर्षमय परिस्थितीत जिद्द व चिकाटीतून यश संपादित करता येते हे परिचारिका म्हणून काम करणाऱ्या स्मिता यांनी दाखवून दिले. स्मिता यांनीही विवाहानंद पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून नर्सिंग कॉलेजमध्ये डेप्यूटी ट्यूटर या पदाला गवसणी घातली.
Web Title: She Became A Nurse After Marriage And His Boy Became A
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..