
Unseasonal rains lash North Solapur; surviving crops destroyed, farmers in tears.
Sakal
उ. सोलापूर: बुधवारी मध्यरात्री उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्री बाराच्या सुमारास चालू झालेला पाऊस पहाटे पाच वाजता बंद झाला. केगाव येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या पर्जन्यमापकात या पावसाची ६५ मिलिमीटर इतकी नोंद झाली. या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. काढणीस आलेला उडीद, सोयाबीन लागण केलेल्या कांदा रोपांना याचा सर्वाधिक फटका बसला.