उत्तर सोलापूर तालुका कोरोना मुक्तीच्या वाटेवर 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत 588 तर ग्रामीण भागात 3 हजार 112 असे फक्त 3 हजार 700 कोरोनाबाधित रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात सध्या फक्त चारच कोरोना बाधित रुग्ण असल्याने हा तालुका आता कोरोना मुक्तीच्या वाटेवर आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील कोरोना मुक्त होणारा तालुका म्हणून उत्तर सोलापूर तालुका पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागात 177 तर महापालिका हद्दीत 21 अशा एकूण 198 नव्या कोरोना बाधितांची भर आज जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 38 हजार 771 झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 29 हजार 425 तर महापालिका हद्दीतील 9 हजार 346 बाधितांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार 263 एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना मुक्त व्यक्तींची संख्या आता 33 हजार 687 झाली आहे. 

आजच्या अहवालानुसार महापालिका हद्दीतील दोन व ग्रामीण भागातील 10 अशा एकूण 12 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 47 अहवाल प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात 717 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील 34 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर 679 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या फक्त चारच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 702 ऍक्‍टिव्ह रुग्ण बार्शी तालुक्‍यात आहेत. उत्तर सोलापूर नंतर सर्वात कमी 23 ऍक्‍टिव्ह रुग्ण हे दक्षिण सोलापूर तालुक्‍यात आहे. मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी 56 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com