Siddheshwar Sugar Factory : चिमणी पाडकामाची नोटीस रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

notice issued by Municipal Corporation for demolition of Chimney of Sri Siddheshwar Sugar Factory should cancelled solapur

Siddheshwar Sugar Factory : चिमणी पाडकामाची नोटीस रद्द करा

सोलापूर : सोलापूरच्या भविष्यासाठी होटगी रोड विमानतळाऐवजी बोरामणी विमानतळ योग्य आहे. हजारो कामगारांचे कुटुंब, लाखो शेतकऱ्यांचे अर्थार्जन असलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामासाठी महापालिकेने दिलेली नोटीस रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन श्री सिद्धेश्वर शुगर कामगार युनियनचे सुभाष शेजवाल यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना दिले.

श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर हजारो कामगार व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही मूठभर लोक विमानसेवेच्या नावाखाली राजकारण करीत आहेत. विमानसेवेपेक्षा चिमणी पाडून कारखाना बंद करण्याचा कुटील डाव रचत आहेत. प्रशासनाकडून होणारी अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवण्यात यावी. तसेच चिमणी पाडकामप्रकरणी दिलेली नोटीस रद्द करावी. बोरामणी येथील विमानतळ सुरू करावे.

राष्ट्रीय हरित लवादाचा अन्यायकारक आदेश रद्द करण्यात यावा तसेच कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो शेतकरी व कामगारांवर होणारा अन्याय थांबवावा, अशा मागणीचे निवेदन श्री सिद्धेश्वर शुगर कामगार युनियनच्यावतीने आयुक्त शीतल तेली-उगले यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष शेजवाल, कामगार युनियनचे अध्यक्ष भीमराव बिराजदार, उपाध्यक्ष धप्पाधुळे, राजू पाटील, जगन्नाथ पाटील, उमाकांत कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.