esakal | आता श्री विठ्ठलाचे चोवीस तास ऑनलाइन दर्शन !
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthal-Rukmini

आता श्री विठ्ठलाचे चोवीस तास ऑनलाइन दर्शन !

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात श्री विठ्ठल आणि श्री रुक्‍मिणी मातेचा पलंग काढण्याची प्रथा आहे.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात श्री विठ्ठल आणि श्री रुक्‍मिणी मातेचा पलंग काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 12) पलंग काढण्यात आला आणि श्री विठ्ठलाच्या पाठी लोड तर श्री रुक्‍मिणी मातेच्या पाठी तक्‍क्‍या ठेवण्यात आला. पूर्वी पलंग काढलेल्या दिवसापासून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले केले जायचे. कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी आहे. तथापि सोमवारपासून मंदिर समितीच्या वेबसाईटवरून भाविकांना 24 तास दर्शन घेता येणार आहे. (Now, 24 hours online darshan of Shri Vitthal-Rukmini Mata from Pandharpur is going on)

हेही वाचा: "दहिगाव'च्या 342.30 कोटींच्या प्रस्तावास मान्यता !

आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या (Ashadi and Karthiki Yatras) वेळी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मातेच्या दर्शनासाठी येतात. त्या वेळी जास्तीत जास्त भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर चोवीस तास अहोरात्र उघडे ठेवले जाते. आषाढी आणि कार्तिकी या दोन यात्रांच्या वेळी श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचा पलंग काढून देवाच्या पाठीशी लोड तर श्री रुक्‍मिणी मातेच्या पाठीशी तक्‍क्‍या ठेवण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या सावटामुळे आषाढी यात्रेत भाविकांना पंढपुरात येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु मंदिरातील प्रथा- परंपरा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पलंग काढण्यात आला. आता देवाचे सर्व राजोपचारही बंद राहणार असून परंपरेप्रमाणे यात्रा झाल्यावर प्रक्षाळपूजेनंतर राजोपचार नेहमीप्रमाणे केले जाणार आहेत.

हेही वाचा: "ऑनलाइन' तहकूब, "ऑफलाइन'चा प्रस्ताव ! झेडपी शोधतेय मोठे सभागृह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात जाता येणार नसले तरी आता मंदिर समितीच्या वेबसाईटवरून भाविकांना विठूमाऊलीचे 24 तास दर्शन घेता येणार आहे. याप्रसंगी मंदिरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्या शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

loading image