esakal | "ऑनलाइन' तहकूब, "ऑफलाइन'चा प्रस्ताव ! झेडपी शोधतेय मोठे सभागृह
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur ZP

"ऑनलाइन' तहकूब, "ऑफलाइन'चा प्रस्ताव ! झेडपी शोधतेय मोठे सभागृह

sakal_logo
By
प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

ऑनलाइन सभेला सदस्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर अखेर ऑनलाइन सभा तहकूब करण्यात आली.

सोलापूर : जिल्हा परिषदेची (Solapur Zilla Parishad) सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्याचे नियोजन सोमवारी प्रशासनाने केले होते. ऑनलाइन सभेला सदस्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर अखेर ऑनलाइन सभा तहकूब करण्यात आली. सर्वसाधारण सभा ऑफलाइनच घेण्यावर आता एकमत झाले असून, ही सभा कुठे घ्यायची? आणि कधी घ्यायची? यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांच्यात बोलणी सुरू आहे. सोमवारी तहकूब झालेली सभा पुढच्या सोमवारी (ता. 19) होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. (Solapur Zilla Parishad is looking for a large hall for offline meetings)

हेही वाचा: दरोड्यातील संशयित आरोपीचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

या सभेसाठी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर (Hutatma Smruti Mandir) किंवा रंगभवन सभागृह उपलब्ध होते का? यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हे सभागृह सर्वसाधारण सभेसाठी उपलब्ध होऊ शकत नाही. ऑनलाइन सभेला विरोध दर्शविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. या ठिय्या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे देखील सहभागी झाले होते. या वेळी ऍड. सचिन देशमुख, सुभाष माने, अरुण तोडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, आनंद तानवडे, भारत शिंदे, मदन दराडे, त्रिभुवन धाईंजे, स्वाती कांबळे, रेखा राऊत, सभापती रजनी भडकुंबे, मल्लिकार्जुन पाटील, पक्षनेते अण्णाराव बाराचारे, शिवाजी सोनवणे, दादासाहेब बाबर, मंजुळा कोळेकर, माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, नितीन नकाते यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या कारभारावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. केवळ आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही सभा ऑनलाइन घेतली जात असल्याचा आरोप केला. जोपर्यंत सभा तहकूब होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असा इशारा दिला.

हेही वाचा: माता न तू वैरीणी ! अज्ञातांनी सोडून दिले बावी येथे नवजात अर्भक

ऑफलाइन सभा शक्‍य

जिल्हा परिषदेचे सदस्य 66, पंचायत समितीचे 11 सभापती, विभागप्रमुख यांच्यासह सभेला जेवढे लोक उपस्थित राहणार आहेत, त्या संख्येच्या दुप्पट क्षमतेचे सभागृह जिल्हा परिषद शोधत आहे. सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या पन्नास टक्के उपस्थितीत सभा घेण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ऑफलाइन सभा घेण्यासाठी सभागृह मिळविण्याचा प्राधान्याने शोध घेतला जात आहे.

loading image