भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ

आता भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ
आता भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ
आता भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ
Updated on
Summary

रांजणी (ता. पंढरपूर) येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेतून डाळिंब फळाची चोरी करताना एका सराईत चोराला शेतकऱ्याने रंगेहाथ पकडले आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) शहर व तालुक्‍यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. रांजणी (ता. पंढरपूर) येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंब (Pomegranate) बागेतून डाळिंब फळाची चोरी करताना एका सराईत चोराला शेतकऱ्याने रंगेहाथ पकडले आहे. लहू शिवाजी कांबळे (रा. तारापूर, ता. पंढरपूर) असे या संशयित डाळिंब चोराचे नाव आहे. पंढरपूर शहरात घरफोडी व मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असतानाच, आता ग्रामीण भागात शेती पिकांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या डाळिंब फळांना चांगला दर असल्याने चोरांनी डाळिंब बागांना लक्ष्य केले आहे.

आता भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ
बहरली 'उजनी'! फ्लेमिंगोपाठोपाठ पट्टकदंब हंसाचेही झाले आगमन!

याबाबतची माहिती अशी की, रांजणी येथील डाळिंब शेतकरी बालाजी गोरख ढेकळे यांची एक एकर डाळिंब बाग सध्या फळावर आली आहे. चोरांचा सुळसुळाट सुरू असल्याने ते सतत बागेची पाहणी करण्यासाठी शेतात जातात. मंगळवारी (ता. 7) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बागेत पाहणी करण्यासाठी गेले असता, बागेत कोणीतरी डाळिंब तोडत असल्याचा संशय आला. बागेत जाऊन पाहणी केली असता आरोपी लहू कांबळे हा तोडलेली डाळिंबं पोत्यात भरून मोटारसायकलवरून धूम ठोकण्याच्या तयारीत असतानाच फिर्यादीने आरोपीस डाळिंबासह रंगेहाथ पकडले.

आता भुरट्यांचा मोर्चा पिकांकडे! शेतकऱ्यानेच पकडले डाळिंबचोराला रंगेहाथ
तुमचं नाव 'प्रणिती' आहे? असेल तर सोने पे सुहागाच!

या वेळी आरोपी चोराकडून शंभर रुपये किलो दराचे सुमारे 80 किलो वजनाची सोळा हजार रुपये किमतीचे डाळिंब हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीमालाच्या व साहित्याच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच आता डाळिंब चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी ग्रामीण भागात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com