रक्तदानाचा आकडा गेला एक हजाराच्या वर

blood camp.jpg
blood camp.jpg
Updated on

श्रीपूर(सोलापूर)ः आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामध्ये आतापर्यंत 1 हजार 365 जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदात्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी प्रतिसाद दिला आहे. 

सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा पाहता आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्तदान शिबीरे होत आहेत अशी माहिती विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांनी दिली. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने येथे आयोजित केलेल्या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादुले म्हणाले 1 ते 10 जून या कालावधीत ही शिबीरे होत आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 365 व्यक्तींनी रक्तदान केले आहे. या शिबीरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कारखान्याच्या वतीने सॅनीटायझर व मास्कचे वितरण करण्यात आले. 

आज झालेल्या शिबीरात माळशिरस तालुक्‍यातील 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
यावेळी रावसाहेब सावंत-पाटील, राहुल रेडे, माणिक बापु मिसाळ, मोहन लोकरे, सुदर्शन मिसाळ, मौलाभाई पठाण, भाऊसाहेब भांगे, मनोज शेळके, राहुल खटके, शरद मुंडफणे, कृष्णात खटके, माऊली जोरवर, विक्रमसिंह लाटे, किरण जोरवर, काकासाहेब सावंत-पाटील, उत्तम भोसले, बाबासाहेब पाटील, विष्णुपंत रेडे, भारत काळे, सुनिल राजमाने, सागर भोसले, नितीन कचरे, राहुल टीक, सुमित भोसले, धनाजी वाघ, गजानन पाटील, लखन धुमाळ, अनिकेत मुंडफणे, दादा गमे, सागर चव्हाण, नारायण पाटील, अनिल पाटील, नवनाथ पवार, आण्णा शिंदे, ज्ञानेश्वर रेडे मुख्य शेती अधिकारी संभाजी थिटे, मुख्य ऊस विकास अधिकारी महेश भादुले,शेती अधिकारी सुनिल बंडगर, ऍग्रीसुपरवायझर बाळासाहेब निकम आदी मान्यवर उपस्थित होते. 

अनेक रक्तदाते वंचित 
अकलूजच्या ब्लड बॅंकेच्या मदतीने श्रीपूर येथे आज शिबीर घेण्यात आले. 101 लोकांचे रक्तदान झाल्यावर ब्लड बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काम थांबवले. त्यामूळे माळशिरस तालुक्‍यातील विविध गावातून रक्तदानासाठी आलेले रक्तदान करु शकले नाहीत. 
-सुनिल बंडगर शेती आधिकारी विठ्ठलराव शिंदे कारखाना. 

क्षमतेपेक्षा अधिक रक्तसंकलन अशक्‍य 
मर्यादेपेक्षा अधिक रक्तसंलन केले तर त्याची साठवणूक करण्यात अडचण आहे. रुग्णापर्यंत पोहचणार नाही त्यामुळे आम्ही यापेक्षा अधिक रक्त संकलन करु शकत नाही.

- तुषार साबळे, ब्लड बॅंक समन्वयक अकलूज.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com