esakal | कोरोना बाधितांची संख्या आता 32 झाली 
sakal

बोलून बातमी शोधा

corona-virus.jpg

ठळक बाबी... 

  • कोरोनाबाधित भागातून राज्यात आलेल्या 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण 
  • राज्यात आतापर्यंत आढळले 32 कोरोनाबाधित रुग्ण : 758 जण विलीकरण कक्षात दाखल 
  • शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये पाच तर आज सकाळी औरंबादेत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला 
  • नियमांनुसार सूचना न पाळणाऱ्या व्यक्‍तींवर कारवाईचे आदेश 

कोरोना बाधितांची संख्या आता 32 झाली 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे महापालिका, मुंबई, नागपूर, यवतमाळ, रायगड, ठाणे, कल्याण, मुंबई, नगर व औरंगाबाद या शहरांमध्ये आतापर्यंत 32 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आरोग्य विभागाने आज स्पष्ट केले. 


हेही नक्‍की वाचा : मोदी सरकार अर्रार्र ! पंतप्रधान आवास योजनेतील 20 लाख लाभार्थी बेघरच 


राज्यभरात रविवारी (ता. 15) 95 संशयीत रुग्णांना दवाखान्यांमध्ये भरती करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक हजार 584 विमानांमधील एक लाख 81 हजार 925 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरोना बाधित भागातून एक हजार 43 प्रवासी महाराष्ट्रात आल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने 758 जणांना राज्यातील विविध विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत 669 संशयीतांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 32 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणून राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलीकरण कक्ष स्थापन करण्यात आली आहेत. त्याठिकाणी 502 बेड उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : रंगपंचमी दिवशी त्यांनी ठोकली धूम अन्‌.... 


ठळक बाबी... 

  • कोरोनाबाधित भागातून राज्यात आलेल्या 442 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण 
  • राज्यात आतापर्यंत आढळले 32 कोरोनाबाधित रुग्ण : 758 जण विलीकरण कक्षात दाखल 
  • शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये पाच तर आज सकाळी औरंबादेत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला 
  • नियमांनुसार सूचना न पाळणाऱ्या व्यक्‍तींवर कारवाईचे आदेश 

हेही नक्‍की वाचा : बळीराजाची कोंडी ! कर्जमाफीनंतरही 39 लाख शेतकरी थकबाकीतच 


लालपरीच्या वाहकांकडे आता सॅनिटरी लिक्‍विड 
राज्यातील गर्दीच्या बसस्थानकांवरील बैठक व्यवस्था दररोज दिवसांतून दोन-तीनवेळा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. बस स्थानक परिसरात जंतूनाशकाची फवारणी करावी, वाहकांनी स्वत:कडे सॅनिटरी लिक्‍विडची बाटली बाळगावी, आगारातून बाहेर पडणारी प्रत्येक बस सॅनिटरी लिक्‍विडमिश्रित पाण्याने स्वच्छ करुनच सोडावी, असे आदेश परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी (ता. 15) सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यानुसार कार्यवाहीला सुरवात झाल्याचे चित्र आहे.