उन्हाच्या चटक्यांमुळे वाढली एसी बसला प्रवाशांची संख्या

‘शिवशाही’मुळे वाढले १५ ते २० टक्के उत्पन्न
shivsahi
shivsahisakal

सोलापूर - राज्य सरकार व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. परिणामी, बुधवारपासून (ता. २७) ३१ शिवशाही, खासगी सेमी लक्झरी १५ तर सहा सीटर स्लिपर व साध्या ४७९ बस विविध मार्गांवर धावल्या. बससेवा पूर्ववत झाल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळ उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ९ एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले व २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले असून, बससेवा सुरळीत झाली आहे. सोलापूर- पुणे, सोलापूर- मुंबई आदी मार्गांवर शिवशाही, शयनयान, हिरकणी बस आता पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यातील विविध शहरांचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. उकाड्यामुळे दिवसा साध्या बसने प्रवास करणे असह्य होते. त्यामुळे वातानुकूलित बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापूर विभागाला चांगले उत्पन्न मिळत आहे. दररोज एक लाख ९९ हजार किलोमीटरचा प्रवास होत असून, विभागास ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

‘शिवशाही’मुळे वाढले १५ ते २० टक्के उत्पन्न

सोलापूर-पुणे, सोलापूर-मुंबई मार्गावर काही दिवसांपूर्वी शिवशाही बस धावत होत्या. यातून विभागात मोजके उत्पन्न मिळत होते. आता ३१ शिवशाही बसच्या माध्यमातून दररोज दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सोलापूर- पुणे मार्गावर देखील शिवशाहीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार-रविवारी पुणे मार्गावर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शिवशाहीचे उत्पन्न १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com